महिला पैलवानांच्या लैंगिक छळ प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्लीच्या राऊझ एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निकाल

Foto
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या राऊझ एव्हेन्यू न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महिला पैलवानांनी लावलेल्या आरोपांमधून ब्रिजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर आता बजरंग पूनिया यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली आहे. 
न्यायालयाच्या बंद खोलीत या प्रकरणाची सुनावणी पार पडली. माध्यमांना कोर्टात प्रवेश नसल्याने सुनावणीनंतर ब्रिजभूषण यांच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना ही मसन्मानपूर्वक मुक्तताफ असल्याचे सांगितले. ६ महिला पैलवानांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावाला. या प्रकरणातील सह-आरोपी आणि डब्ल्युएफआयचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या बंद खोलीत या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ६ महिला पैलवानांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या तक्रारींनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.

आम्ही हायकोर्टात दाद मागणार
दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. लवकरच दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन पुढील न्यायालयीन लढा कसा लढायचा, याबाबत माहिती देणार आहोत, असे बजरंग पूनिया यांनी म्हटले आहे. माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, त्यांनी पूर्वी जे म्हटले होते ते आता सिद्ध झाले आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितले की, न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहेत. तक्रार आणि तक्रारदाराच्या विधानांमध्ये अनेक विसंगती आणि विरोधाभास आहेत, ही त्यांची सुरुवातीपासूनच भूमिका आहे. न्यायालयाचा सविस्तर आदेश लवकरच जारी केला जाईल, त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीवर सविस्तर चर्चा केली जाईल.

प्रकरणाची पार्श्वभूमी अन् प्रमुख घडामोडी:
१५ जून २०२३: दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४-अ, ३५४-डी आणि ५०६(१) अंतर्गत सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. 
१० मे २०२४: ट्रायल कोर्टाने ५ महिला पैलवानांच्या तक्रारींवरून ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि विनयभंगाचे आरोप निश्चित केले होते.
पॉक्सो गुन्हा बंद: एका अल्पवयीन महिला पैलवानानेही ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले होते, मात्र नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली. पोलिसांनी याप्रकरणी मकॅन्सेलेशन रिपोर्टफ सादर केल्यावर हे प्रकरण बंद करण्यात आले होते.

जंतर-मंतरवरील आंदोलनापासून सुरू झाला होता वाद
 महिला पैलवानांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिनाभर तीव्र आंदोलन केले होते. देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर राऊझ एव्हेन्यू कोर्टाने पुराव्यांच्या अभावी ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे.